‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र ?

‘गझवा-ए-हिंद

केंद्रशासनाने नुकतीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातली. या संघटनेचा राजकीय पक्ष असणार्‍या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’वरही (‘एस्.डी.पी.आय.’वरही) कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिहादी मानसिकता बाळगून आतंकवादाचे समर्थन करणार्‍या संघटनेवर बंदी घातल्याने ‘इस्लामी कट्टरतावादाला धक्का लागण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे’, असे म्हणता येईल; पण याची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत. मुळात आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे. ‘गझवा-ए-हिंद’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘मूर्तीपूजा करणार्‍यांची कत्तल करा’, ‘संपूर्ण जगावर इस्लामी धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करा’ आणि ‘सर्वांचे धर्मांतर करा’, या गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत. हा ‘अजेंडा’ कट्टर मौलवी आणि फुटीरतावादी यांनी सिद्ध केलेला आहे.

जिहादी आतंकवाद्यांना भारतात इस्लामी राष्ट्र आणायचे आहे. याविषयी इस्लामिक विद्वान रिझवान अहमद यांनी म्हटले आहे, ‘‘आतापर्यंत ‘गझवा-ए-हिंद’चे ५० टक्के ध्येय पूर्ण झाले आहे. वर्ष २०५० पर्यंत देशातील मुसलमानांची लोकसंख्या २५ टक्के होईल. २५ टक्के लोकसंख्या मुसलमान मुख्यमंत्री होण्यासाठी पुरेशी असते. मुसलमानांची संख्या २९ टक्क्यांपर्यंत वाढली की, येत्या ५० ते ६० वर्षांत भारताचा पंतप्रधान मुसलमान झालेला असेल.’’ यावरून आतंकवादी संघटनांवर बंदी घालणे किंवा जिहादी आतंकवाद्यांना शिक्षा करणे किती आवश्यक आहे ते लक्षात येईल; मात्र त्याही पुढे जाऊन जगभरात ज्यांना ‘गझवा-ए-हिंद’ची स्वप्ने पडत आहेत, त्यांच्याशी दोन हात करून भारतातील हिंदूंचे रक्षण करणे, हे फार मोठे दायित्व येणार्‍या काळात पार पाडावे लागणार आहे.

आक्रमकांचा आदर्श (?) !

गेल्या सहस्रो वर्षांपासून इस्लामिक कट्टरपंथीय भारताला इस्लामीस्तान करण्याची वाटच पहात आहेत. पूर्वीच्या काळातील मुसलमान आक्रमकांनी केवळ भारतातील संपत्ती लुटली नाही, तर या भूमीतून हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि हिंदू यांना नष्ट करून या देशावर हिरवा झेंडाफडकावण्याचे स्वप्न बाळगले. त्या काळी हिंदूंनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. आता हेच स्वप्न बाळगून जगभरातील जिहादी, आतंकवादी आणि धर्मांध भारताला अन् हिंदूंना लक्ष्य करत आहेत. ‘पी.एफ्.आय. संघटना नाव पालटून तिचे कार्य चालू ठेवणार का ?’, ‘या संघटनेशी निगडित ५० लाख कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का ?’ आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली जात आहे; मात्र या संघटनेने ‘गझवा-ए-हिंद’साठी हिंदूंमध्ये निर्माण केलेल्या दहशतीविषयी कुणी बोलत नाही. आज पी.एफ्.आय.वर बंदी घातली, तरी ‘गझवा-ए-हिंद’ने प्रेरित झालेले अनेक जिहादी तरुण उद्या दुसर्‍या नावाने एखादी संघटना उभारून हिंदुविरोधी कारवाया चालूच ठेवतील. त्यांना कसे रोखायचे ? त्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील जिहादी ‘गझवा-ए-हिंद’चे स्वप्नच काय, हे शब्दही उच्चारण्यास धजावणार नाहीत, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीवरून ‘भारतावरील संकट टळले’, असे म्हणता येणार नाही, तर ‘या संकटाची व्याप्ती पी.एफ्.आय.च्या कारवायांमुळे आपल्या लक्षात आली’, असे आपल्याला म्हणता येईल. हे संकट परतवून लावण्याचे फार मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

धर्मांध संघटनांनो, चालते व्हा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु राष्ट्राची मागणी केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी मागणी करणारे ते एकमेव होते. गेल्या काही वर्षांपासून ‘हिंदु राष्ट्रा’च्या मागणीचा पुरस्कार सनातन संस्था करत आहे; हळूहळू अनेक हिंदूंना याचे महत्त्व लक्षात आल्याने अनेकजण आता हिंदु राष्ट्राचा मोठ्या प्रमाणात उद्घोष करू लागले आहेत. भारत आणि हिंदु धर्म यांसाठी ही आशादायी गोष्टच म्हणावी लागेल. हिंदु राष्ट्रात हिंदूंचा खर्‍या अर्थाने आध्यात्मिक उत्कर्ष साधला जाणार आहे; पण असे न होता ‘गझवा’च्या तावडीत गेल्यास हिंदूंना पदोपदी अन्याय, अत्याचार यांनाच सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे. कट्टरतावादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला विरोध करतांना दिसतात; कारण हिंदु राष्ट्राचे सामर्थ्य आणि त्याची परिणामकारकता त्यांच्या बुद्धीला काडीमात्रही समजत नाही.  ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘इस्लामी राष्ट्र’ यांची तुलना कधीच होऊ शकणार नाही. आताही विश्वात अनेक इस्लामी राष्ट्रे उदयास आलेली आहेत; पण तेथील जनता खरोखर सुखी, समाधानी, आनंदी आहे का ? तर नाही. तेथील इस्लामी शासन काय भयानक प्रकार करत आहे, हे सर्वजण पहात आहेत. त्यामुळे ‘अन्यायकारक असणारे इस्लामी राष्ट्र भारतात कदापि निर्माण होऊ द्यायचे नाही’, असा ठाम निर्धार भारतीय आणि हिंदू यांनी करायला हवा. हिंदूबहुल भारत हे इस्लामी राष्ट्र म्हणून उदयास येणार तर नाहीच; पण अशी घातक इच्छा बाळगणार्‍यांचा धर्माभिमानी हिंदू आणि भारतीय यांनी ठामपणे सामना करायला हवा. ‘पी.एफ्.आय.’वर ज्याप्रमाणे बंदी घालण्यात आली, त्याप्रमाणे जिहादी कृत्ये करणार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे.

अनेकांच्या मनात असणारी हिंदु राष्ट्राची सुप्त इच्छा आता प्रबळ होत चालली आहे. ती कृतीशीलता आणि गतीमानता यांचे स्वरूप घेत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतियांच्या मनात रुजवलेले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे बीज येत्या काही वर्षांतच साकार होणार आहे. भव्य, व्यापक आणि तेजःपुंज असणार्‍या हिंदु राष्ट्रापुढे इस्लामी राष्ट्राचा टिकावही लागणार नाही. तेव्हा धर्मांध संघटनांनाच या देशातून चालते व्हावे लागणार आहे, हे धर्मांध समर्थकांनी लक्षात घ्यावे ! असे होईल तेव्हा सर्वत्र एकच उद्घोष असेल, ‘हिंदु राष्ट्राचा विजय असो, विजय असो, विजय असो !’