पी.एफ्.आय.ची पाळेमुळे सखोल नष्ट होईपर्यंत कठोर कारवाई चालू ठेवली, तरच या धाडींची फलनिष्पत्ती मिळेल !
अखेर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.)चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यालये यांवर संपूर्ण भारतात २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री धाडी टाकण्यात आल्या. १२ राज्यांतून एकाच वेळी १०६ हून अधिक लोकांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी अटक करून भ्रमणसंगणक अन् कागदपत्रे यांसह अन्य पुरावे कह्यात घेतले. ही कारवाई म्हणजे हिंदुत्वनिष्ठांच्या पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचा हा आरंभ आहे. अनेक मास ‘पी.एफ्.आय.ची पाळेमुळे, पैशांचे स्रोत आदींचा शोध यंत्रणा घेत असणार’, हे उघड आहे; परंतु ‘राष्ट्र आणि हिंदू यांची अतीव हानी झाल्यावर शेवटी ही कारवाई झाली’, असेच म्हणावे लागेल.
पी.एफ्.आय.ची राष्ट्रद्रोही कुकृत्ये !
ही राष्ट्रद्रोही संघटना ‘वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे ध्येय’ ठेवून कार्यरत आहे. त्यासाठी हिंदूंना ठेचण्याची आणि राष्ट्रविरोधी म्हणून जे जे काही करता येईल, ती सर्व क्रूर कृत्ये ही संघटना करत आहे. हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सशस्त्र कारवायांवर या संघटनेचा भर आहे. केरळमध्ये त्यांनी ‘समांतर सैन्य’ बनवले असून त्याच्या कवायती होत असतात. इतकेच नव्हे, तर पाटलीपुत्र (बिहार) आणि निझामाबाद (तेलंगाणा) येथे त्यांची आतंकवादी प्रशिक्षण केंद्रेही उघडकीस आली. देशभर या प्रशिक्षणाची शिबिरे चालू होती. विशेष म्हणजे साम्यवादी केरळ सरकारच्या पोलिसांकडून या संघटनेच्या एका नेत्याला अग्नीशमन प्रशिक्षण देण्यात आले होते. केवळ कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी वरवर समाजकार्य दाखवणार्या संघटनेचे दाखवायचे दातही वेगळे नाहीत, तर ती उघडपणे राष्ट्र आणि हिंदु धर्म विरोधी कारवाया करत आहे. भारतविरोधी पुस्तके वाटत आहे. भारतातील शांत मुसलमानांना नमाजानंतर भडकावण्याचे काम यांचे नेते करतात. या प्रकरणी मुंब्रा (ठाणे) येथे पोलिसांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘शाहीनबाग’, ‘हिजाब’ यांसारखी तथाकथित आंदोलने चालवणे, ‘लव्ह जिहाद’चे प्रशिक्षण आणि त्यासाठी धर्मांधांना फूस लावणे अन् त्यांना पैसे पुरवणे यांमागे या संघटनेचा हात होता. देहलीतील दंगलीसह अनेक दंगलींमध्ये पी.एफ्.आय.चा हात असल्याचे पुढे आले आहे. शाळांमध्ये इस्लामी प्रार्थना शिकवणे, शाळांना शुक्रवारी सुटी देणे या माध्यमांतून शाळांचे इस्लामीकरण करण्याच्या घटनांमध्येही या संघटनेचा संबंध असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’शी त्यांचा संबंध पुढे आला. ‘रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांचे बनावट (खोटे) आधारकार्ड ही संघटना बनवत आहे’, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली होती. जुलै २०१० मध्ये आसाममधील प्रा. टी.जे.जोसेफ यांनी प्रश्नपत्रिकेवर ‘महंमद’ असे लिहिल्याने त्यांचा हात या संघटनेच्या आतंकवाद्यांनी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून कापला आणि यातून यांची क्रूरता प्रामुख्याने समोर यायला लागली. पी.एफ्.आय.ने भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यासाठी १०० जणांची सूची बनवलेली आहे. आतापर्यंत देशभरात ४५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झालेल्या आहेत; त्यांतील बहुतांश हत्यांमध्ये या संघटनेचे नाव पुढे आले. नूपुर शर्मा यांच्या विरोधातील आंदोलनात या संघटनेला अर्थपुरवठा करणार्या तुर्कीये देशाचे झेंडे फडकावण्यात आले. त्यामुळे ‘सर तन से जुदा’ या मोहिमेमागे पी.एफ्.आय.चा हात असण्याचीच दाट शक्यता आहे. वर्ष १९२१ मध्ये झालेला हिंदूंचा नरसंहार आणि १०० मंदिरे उद्ध्वस्त करणे याविषयीचे ‘शताब्दी’ वर्ष पी.एफ्.आय.ने वर्ष २०२१ मध्ये साजरे केले. त्या वेळी दहशत पसरवण्यासाठी मिरवणूक काढणार्या पी.एफ्.आय.च्या आतंकवाद्यांना या धाडींच्या निमित्ताने आता निदान एक तरी धक्का बसला आहे.
‘देर है दुरुस्त है ।…’
दुर्दैवाने पूर्वी काही पोलिसांनी पी.एफ्.आय.ला ‘सांस्कृतिक संघटना’ म्हटले, तरी ही संघटना प्रत्यक्षात काय करते ? हे शासन आणि प्रशासन यांना ठाऊक नव्हते, यावर कोण विश्वास ठेवेल ? ‘संपूर्ण भारतभर अनेक बाँबस्फोट करणार्या ‘इंडियन मुजाहिदिन’ या संघटनेशी जवळीक असणार्या पी.एफ्.आय.वर कारवाईची सिद्धता करायला मात्र हिंदूंचा अंत पाहिला गेला’, असे हिंदूंना वाटले, तर चूक नव्हे ! ही सिद्धता विलंबाने का चालू केली ? ही आतंकवादी संघटना वाढूच का दिली गेली ? रा.स्व. संघाच्या कित्येक कार्यकर्त्यांच्या अत्यंत क्रूरपणे केलेल्या हत्यांमागे या संघटनेचा हात असल्याचे कित्येकदा उघड होऊनही या संघटनेवर मुळापासून कारवाई होत नव्हती, हे अतिशय दुर्दैवी होते. परत परत हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या की, हे सूत्र तितकेच गांभीर्याने येत होते. त्यांचे अत्याचार एवढे वाढले होते की, कर्नाटकात काँग्रेसच्या आमदारांनीही या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली. हिंदु-मुसलमान ऐक्याच्या तथाकथित घोषणा करणारे नेते आणि अभिनेते कधीही पी.एफ्.आय.च्या क्रूर कारवायांविषयी बोलतांना दिसत नाहीत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यावर ‘तुर्कीयेसारख्या देशांकडून यांना अर्थपुरवठा होतो’, याचा कबुलीजबाब त्यांनी दिला आहे. चीनसारखे देश धर्मांधांना आपल्या दबावाखाली ठेवतात. भारतात मात्र त्यांना खुले रान उपलब्ध असते. या धाडींनंतरही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध चालू करून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊन दंगलसदृश वातावरण निर्माण करायला आरंभ केला आहे. त्यामुळे आता पोलीस बळ व्यय होणार आहे. हत्या, दंगली आणि लव्ह जिहाद करून हिंदूंचा वंशविच्छेद करणार्या पी.एफ्.आय.ची पाळेमुळे सखोल नष्ट होईपर्यंत ही कारवाई चालू रहायला हवी. हिंदु जनजागृती समितीने पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची मागणी करत आंदोलने केली, शासनाला निवेदने दिली. ‘सिमी’ संघटनेवर बंदी घातल्यानंतर ती फोफावली होती. तसे आता परत न होण्यासाठी आणि ‘इस्लामी राष्ट्रा’ची स्थापना टाळण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची उभारणी’ करणे, हाच याच्या मुळावरील घाव आहे !