मुलायम !

मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

(अज्ञानी) पुरुष !

‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !

‘नोबेल’ पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ !

खोट्या बातम्या देणार्‍या जुबेर याचे नामांकन ! दुर्दैवाने भारतातही या ‘नोबेल’च्या वृत्तांना आणि तो मिळालेल्या व्यक्तींना वारेमाप प्रसिद्धी मिळते. यापुढील काळात हिंदूंना ‘नोबेल’चा पक्षपातीपणा जाणून घेऊन त्यांचा ‘हिंदुविरोधी अजेंडा’ हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !

जागतिक ‘भारतीय’ फुटबॉलपटू !

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे धाडसीपणाचे ठरू शकेल; परंतु सुनील छेत्री यांनी केलेली नेत्रदीपक कामगिरी हा खेळाच्या क्षेत्रातील वास्तविक पुरुषार्थ आहे, हे निश्चित ! भारताला क्रीडा क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी शासनकर्त्यांनी देशात ‘क्रीडा संस्कृती’ रुजवणे आवश्यक !

‘विजयी भव ।’

स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी शारीरिक स्तरावर सक्षम होण्याचे, मानसिक स्तरावर संघर्ष पचवून उभारी घेण्याचे अन् आध्यात्मिक स्तरावर भगवंताच्या अनुसंधानाचे यत्न अविरत चालू ठेवण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर आरंभ करूया अन् हिंदूंची विजयगाथा पुन्हा एकदा काळाच्या पटलावर सुवर्णाक्षरात कोरण्यासाठी सिद्ध होऊया !

मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

भारताच्या विकासाचा ‘५ जी स्पीड’ !

तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये ५ क्रमांकावर पोचली. भविष्यात भारताला महासत्ता बनवण्यामध्ये ‘टेलिकॉम’ क्षेत्राची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरेल !