हिंदूंसाठी असुरक्षित इंग्लंड !

ब्रिटनमधील लीसेस्टरमध्ये हिंदूंवर धर्मांधांचे आक्रमण, मंदिरावरून भगवा ध्वज हटवला !

२ दिवसांपूर्वी इंग्लडमधील लिसेस्टर येथे तेथील पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानांनी स्थानिक हिंदू आणि हिंदूंचे मंदिर यांवर आक्रमण केले. हिंदूंच्या मंदिरावरील भगवे ध्वज काढून फेकून दिले आणि काही ध्वज जाळले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही दिवसांपूर्वी ‘आशिया कप’ क्रिकेटचे सामने झाले. त्यामध्ये २८ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानला हरवले. त्यानंतर काही स्थानिक भारतीय हिंदूंच्या गटांनी तिरंगा घेऊन इंग्लडच्या रस्त्यांवर फेरी काढली. याचा राग स्थानिक मुसलमानांना आला आणि तेव्हापासून त्यांनी स्थानिक हिंदूंना छळणे अन् त्यांच्यावर आक्रमणे करणे चालू केले आहे. या मुसलमानांमध्ये बहुतांश मुसलमान हे पाकिस्तानी, तर काही भारतीय आहेत. या पाकिस्तान्यांनी ‘अल्ला-हो-अकबर’, ‘मोदी कुत्ता मुर्दाबाद’, ‘सर तन से जुदा’ अशा घोषणा देत हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंच्या गाड्यांची मोडतोड करणे, हिंदूंना मारहाण करणे असे २०-२१ दिवस चालू ठेवले आहे. एका धर्मांधाने येथील ६ पोलिसांवर चाकूने आक्रमण करून त्यांना घायाळ केले.

ब्रिटनमध्ये तेथील मुसलमानांचा दर्जा उंचावण्याच्या नावाखाली कार्यरत संघटना हिंदूंची किंवा हिंदुत्वनिष्ठांची प्रतिमाच ‘धर्मांध किंवा कट्टर’ अशी रंगवण्यासाठी मुख्यत्वे कार्य करतात. ‘हिंदू अधिक आक्रमक किंवा हिंसक असतात’ असा खोटा प्रचार या संघटनांकडून केला जातो. परिणामी आगीत तेल ओतल्याप्रमाणे धर्मांध मुसलमानांना हिंदूंवर राग काढण्यात आयते कोलीत मिळते. तेथील एका धर्मांध मुसलमानाने त्याच्या ‘इन्स्टाग्राम हँडल’द्वारे ‘मुसलमान आणि शीख यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेविरुद्ध आंदोलन करूया’, असे आवाहन केले. तेथील स्थानिक मुसलमानांच्या संघटना मुसलमान आणि शीख यांना हिंदूंविरुद्ध भडकावण्याचे काम करत आहेत. ‘यामागे पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.चाच हात आहे’, असेही लक्षात आले आहे.

मुसलमानांचे मोहल्ले !

धर्मांध मुसलमानांना हिंदू अथवा अन्य धर्मीय समुदाय यांची कळ काढण्यास निमित्तच पाहिजे असते. लिसेस्टर येथे ‘हिंदूंनी आमच्या मोहल्ल्यातून (गल्लीतून किंवा भागातून) फेरी का काढली ?’, असा प्रश्न विचारून धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतात. ‘मुसलमानांचा मोहल्ला’ हे भारतात आपण सर्रास ऐकतो; परंतु इंग्लंडमध्येसुद्धा आता तसेच झाले आहे. यावरून धर्मांधांचे भूमीवर मालकी सांगून ती गिळंकृत करण्याचे षड्यंत्र स्पष्ट होते. एका प्रसिद्ध विचारवंताने सांगितले आहे की, मुसलमान एखाद्या ठिकाणी येतात, तेव्हा त्यांची लोकसंख्या १ ते ३ टक्के असते, तेथे ते स्थानिकांशी गोडीगुलाबीने रहातात. त्यांची लोकसंख्या जेव्हा ३ ते ५ टक्के होते, तेव्हा ते मशिदीची मागणी करतात, सर्वांमध्ये मिसळतात. ५ ते ७ टक्के होते, तेव्हा ‘आम्हाला इतरांचा त्रास होतो, आम्हाला वेगळे राहू द्या’, असे सांगण्यास प्रारंभ करतात. ७ ते १० टक्के वाढते तेव्हा ‘आमच्या क्षेत्रात इतरांनी येऊ नये’, असे सांगतात. तेव्हा चोर्‍या, घरफोड्या होतात, गुन्हे वाढतात. जेव्हा लोकसंख्या १० ते १५ टक्के इतकी वाढते, तेव्हा त्यांचे क्षेत्र वेगळे म्हणजे मुसलमानांचे क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी, शरिया कायद्याची मागणी केली जाते. तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जातो. अशा प्रकारे मुसलमानांचा प्रदेश बनतो ! धर्मांध मुसलमानांची जगाचे ‘दार-उल्-इस्लाम’मध्ये (जेथे इस्लामचे राज्य आहे अशी भूमी) रूपांतर करण्याची मानसिकता, हे मूळ आहे. त्यामुळे भारतात बहुतांश अवैधरित्या वाढलेले मुसलमानांचे ‘मोहल्ले’ स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरतात. याला इंग्लडही आता अपवाद राहिलेला नाही, हेच वरील घटनेवरून सिद्ध होते.

इंग्लडची भयावह स्थिती

इंग्लडमध्ये १९७० ते १९८० च्या दशकात मुसलमानांना वसवण्यास प्रारंभ झाला. आता त्यांची संख्या पुष्कळ वाढली आहे आणि गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. वर्ष २०१८ ते वर्ष २०१९ मध्ये इंग्लडमधील १९ सहस्र अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. ‘ग्रूमिंग गँग’ (अल्पवयीन मुलींना फसवून किंवा त्यांना प्रेमपाशात ओढून त्यांच्यावर अत्याचार करणारी टोळी) कडून हे अत्याचार करण्यात आले. १ सहस्र ४०० अल्पवयीन मुलींचा विनयभंग ‘ग्रूमिंग गँग’कडून झाल्याचे उघड झाले होते. या घटना काही प्रमाणात उघडकीस येत असतांना ब्रिटीश पोलिसांना त्याविषयी ठाऊक होते; मात्र स्वत:वर वर्णद्वेषाचा शिक्का बसेल; म्हणून त्यांनी कारवाई केली नाही. तसेच धर्मांध प्रत्येक वेळी ‘व्हिक्टिम कार्ड’ (स्वत:च पीडित आहे, असे वागणे) वापरतात, त्यामुळेही पोलिसांचे हात बांधले जातात. परिणामी २ दिवसांपूर्वी हिंदूंच्या मंदिरावर पोलिसांच्या देखत आक्रमण होत असतांना तेथील पोलीस ते पहात उभे होते. एवढेच नव्हे, तर ब्रिटनमधील एका चर्चवर चढून क्रॉस तोडणार्‍या मुसलमानांवरही पोलिसांनी स्वत:हून नव्हे, तर दबाव वाढल्यावर कारवाई केली. इंग्लडमध्ये आता एवढे पाकिस्तानी मुसलमान भरले आहेत की, लंडनचा महापौर हाही पाकिस्तानी मुसलमानच आहे. हे पाकिस्तानी मुसलमान तेथील व्यवस्था, कायदे यांना न जुमानता झुंडशाहीच्या बळावर ‘इंग्लंडवर स्वत:चीच मालकी आहे’, असे दाखवत आहेत. येणार्‍या ३-४ वर्षांत तेथील परिस्थिती आणखी भयावह होणार आहे. विशेष म्हणजे भारत सरकार हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या संदर्भात एकतर निषेध नोंदवत नाही आणि नोंदवला, तर तो मुळमुळीत असतो. परिणामी तेथील हिंदूंचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी एकीने रहाणे आणि भारतीय वकिलातीवर, भारत सरकारवर धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे आवश्यक आहे, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल !

इंग्लडमधील हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून होणार्‍या आक्रमणांविरुद्ध भारत सरकार कठोर पावले कधी उचलणार ?