अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस उपायुक्तांची न्यायालयात धाव
अर्णव गोस्वामी यांनी माझी आणि मुंबई पोलीस दलाची हेतूपूर्वक अपकीर्ती केली आहे, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अर्णव गोस्वामी यांनी माझी आणि मुंबई पोलीस दलाची हेतूपूर्वक अपकीर्ती केली आहे, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चौकशीची मागणी.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
म्यानमारमधील सद्यःस्थितीवर हाच निर्णय योग्य असून त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती रहाणार आहे’ – म्यानमारचे सैन्यदलप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग
शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. यासाठी सरकारने स्वतःची बाजू जोरकसपणे मांडून आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक घटकांची माहिती समोर आणणे आवश्यक !
शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !
गोंधळ घालणार्या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !
केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?