शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीर हे भारत-पाकिस्तान यांच्यामधील पूर्वीपासून चालत आलेले सूत्र आहे. यावर दोन्ही देशांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन शांततामय मार्गाने तोडगा काढावा, असे विधान पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी येथे केले. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील रिसालपूर येथील पाकिस्तानी वायुदलाच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
(सौजन्य : India Today)
‘परस्परांचा आदर राखणे आणि शांततेने एकत्र रहाणे, यांसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. (पाकचा विनोद ! – संपादक) शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे’, असेही बाजवा म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पाक तिसर्या पक्षाच्या हस्तक्षेपासाठी प्रयत्नशील होते; मात्र आता भारत-पाक यांनी शांततामय मार्गाने तोडगा काढावा, असे म्हणणे महत्त्वपूर्ण ठरते.