गोंधळ घालणार्या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !
नवी देहली – राज्यसभेत शेतकरी आंदोलनावरून सभागृहात गोंधळ घातल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एन्.डी. गुप्ता या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले. या खासदारांनी शेतकर्यांच्या सूत्रांवरून सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेमध्ये येऊन घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
संजय सिंह समेत आप के तीन सांसद दिनभर के लिये निलंबित #AAP #SanjaySingh https://t.co/qHvyhM4cms
— ZEE HINDUSTAN (@Zee_Hindustan) February 3, 2021
त्यानंतर त्यांना मार्शलच्या साहाय्याने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचा आदेश सभापतींनी दिला. याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले की, जेव्हा ‘शेतकरी’ या विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे, तेव्हा ही घोषणाबाजी का केली जात आहे ? ही हुकूमशाही चालणार नाही.