मुंबई – रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात फौजदारी तक्रारीच्या माध्यमातून मानहानीचा दावा केला आहे. अभिनेते सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझी आणि मुंबई पोलीस दलाची हेतूपूर्वक अपकीर्ती केली आहे, असे त्यांनी या तक्रारीमध्ये म्हटले आहे. कुणी जाणीवपूर्वक मानहानी करत असेल, तर ते सहन न करण्याचा सरकारी कर्मचार्याला अधिकार आहे. गोस्वामी यांनी राज्यघटनेने माध्यमांना दिलेल्या भाषा आणि अभिव्यक्ती या स्वातंत्र्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर चालवला आहे. त्यामुळे न्यायालयाने याची गंभीर नोंद घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई डीसीपी अभिषेक त्रिमुखे ने अर्नब गोस्वामी और उनकी पत्नी के खिलाफ दर्ज करवाया मानहानि का मामला https://t.co/tsuXivHKi8 #arnabgoswami #अर्नबगोस्वामी #mumbai #maharashtra #महाराष्ट्र #mumbaipolice #मुंबईपुलिस
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) February 3, 2021
रिपब्लिक टी.व्ही. आणि रिपब्लिक भारत या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ही अपकीर्ती करण्यात आली असून या वाहिन्यांचे मालक आस्थापन ‘एआर्जी आउटलायर मीडिया प्रायव्हेट कंपनी’, तसेच या आस्थापनाचे संचालक गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी सम्यव्रता गोस्वामी यांच्याविरोधात त्रिमुखे यांनी फौजदारी तक्रार केली आहे. अभिषेक त्रिमुखे हे अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या संपर्कात राहून तिला सुशांत प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे निराधार आरोप वाहिन्यांवरून केले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.