
सांगली – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत राज्यशासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू, अशी चेतावणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. ते झरे येथे बोलत होते. (१ वर्ष जर पुतळा अनावरण न होता, तसाच रहात असेल, तर पुतळा ज्या कारणासाठी बांधले त्याचा उद्देश सफल होत आहे का ? त्यामुळे शासनाने यात तातडीने लक्ष घालून पुतळ्याचे अनावरण कसे होईल ते पाहिले पाहिजे ! – संपादक)
आमदार पडळकर पुढे म्हणाले, ‘‘१२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे एक मंदिर आहे आणि या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्यामुळे या मंदिराच्या वतीने प्रवेशद्वारावर अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय झाला. गेल्या १ वर्षापासून हा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. मी हिंगोली दौर्याच्या कालावधीत तेथे गेलो असता माझ्या ते निदर्शनास आले. सध्या हा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आहे.
या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, अशी स्थानिक आमदारांची भावना असल्याने याचे अनावरण अद्याप होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यास आमचा विरोध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याच्या अनावरणाविषयी ठोस भूमिका घ्यावी; अन्यथा तमाम धनगर समाज एकत्र येऊन होळकरांचे वारसा असणारे भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करतील.’’
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !