वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीवरील छताचा आज दुर्गापण सोहळा

वीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीवरील उभारलेले छत

कोल्हापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यात वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या समाधी विशाळगडावर ऊन-वारा-पाऊस झेलत उभ्या आहेत. या समाधींवर छत उभारण्याचे कार्य सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेने हाती असून रविवार, १३ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता त्याचा दुर्गापण सोहळा होणार आहे.

या वेळी चित्रपट अभिनेते श्री. अजय पुरकर आणि श्री. समीर धर्माधिकारी, वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे घराण्याचे वंशज श्री. कौस्तुभ देशपांडे, दुर्ग अभ्यासक श्री. चंद्रकांत साटम यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठानचे सहसंपर्कप्रमुख श्री. गौरव जाधव आणि श्री. अक्षय चौगुले, जिल्हा प्रतिनिधी श्री. गणेश मांगले, कोल्हापूर जिल्हा प्रशासक श्री. अभिजित भालबर, करवीरतालुका प्रशासक श्री. विशाल तांबेकर उपस्थित रहाणार आहेत.