बेंगळुरू (कर्नाटक) – ‘सनातन पंचांग’ अॅप हे अत्युत्तम अॅप आहे, असा अभिप्राय कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेते जग्गेश यांनी व्यक्त केला आहे. ‘सनातन पंचांग २०२१’ या अॅपचा धर्मप्रेमींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रसार केला. त्यावर त्यांनी हे ट्वीट केले.
१. अभिनेते जग्गेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘आपली संस्कृती, देवता, गुरु, आचार्य, सनातन धर्म, नक्षत्र, सणवार यांविषयी अत्युत्तम माहिती या अॅपमध्ये मिळते. याच्या साहाय्याने पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने आपले शुद्ध आचरण विसरलेल्यांना अभिमानाने आपलेपणाची जाणीव होते.’’
ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ದೇವರು ಗುರುಹಿರಿಯರು ಸನಾತಪದ್ಧತಿ
ದಿನ ನಕ್ಷತ್ರ ಹಬ್ಬ ಹರಿದಿನ ಬಗ್ಗೆ ಉತ್ತಮ ಮಾರ್ಗದರ್ಶನದ ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಬಹುದು!
ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ಮರುಳಾಗಿ ನಮ್ಮತನ ಸನ್ನಡತೆ ಮರೆತವರಿಗೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ನಮ್ಮತನದ ಅರಿವುಬರುತ್ತದೆ!ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಎಂಬ ಶುದ್ಧಮನಸ್ಸು ಬೇಕು ಅಷ್ಟೆ! https://t.co/gG8kfUO3CJ— ನವರಸನಾಯಕ ಜಗ್ಗೇಶ್ (@Jaggesh2) December 8, 2020
२. वैशिष्टपूर्ण सूत्र म्हणजे जग्गेश यांनी ‘मी स्वत: गेल्या ५ वर्षांपासून या अॅपचा उपयोग करत आहे’, असे सांगत आणखी एक ट्वीट करून त्यांच्या भ्रमणभाषवर ‘सनातन पंचांग अॅप’ची ‘स्क्रीन शेअर’ केली आहे. त्यांच्या या विशेष ट्वीटला १ सहस्र २०० ‘लाईक’ करण्यात आले आहेत. काही धर्मप्रेमींनी स्वतःही अॅप डाऊनलोड करणार असल्याचे सांगितले आहे. काहींनी या पंचांगाच्या मुद्रित प्रतीची मागणीही केली आहे.