पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार

पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !

जम्मू – पाकने जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि मानकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार झाले, तर ३ जण घायाळ झाल्याची माहिती भारतीय सैन्याच्या सूत्रांनी दिली.

पाकने यावर्षी आतापर्यंत ३ सहस्र २०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. वर्ष १९९९ पासून शस्त्रसंधी करार आहे. पाक सातत्याने याचे उल्लंघन करत असतो. यावर्षी पाकच्या गोळीबारात ३० नागरिक ठार आणि १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. (इतक्या वेळा पाक कराराचे उल्लंघन करत असेल, तर हा करार का ठेवला आहे ? तो रहित का केला जात नाही ? – संपादक)

भारतीय सैन्याच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, पाककडून अचानक गोळीबार चालू झाला. मानकोट सेक्टरमध्ये सर्वाधिक गोळीबार झाला. येथील काही नागरिकांच्या घरांची हानी झाली. या गोळीबाराला आम्ही प्रत्युत्तर दिले. पाकने अनेक नवीन बंकर बनवले आहेत. तेही उद्ध्वस्त केले.