हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी कालवश

हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी (वय ७२ वर्षे) यांचे ५ डिसेंबर २०२० या दिवशी लंडन येथे देहावसान झाले. जय लखानी यांचा जन्म केनियाच्या मोम्बासा येथे वर्ष १९४८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपण टांझानियाच्या दारेसलाममध्ये गेले. वर्ष १९६४ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ते लंडनला आले आणि पुढील शिक्षण घेतले.

सावंतवाडी शहरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणात टेम्पोचालक गंभीर घायाळ

कोल्हापूर येथून सावंतवाडीला साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोचालकावर शहरातील जिमखाना मैदानाजवळ दोघा अज्ञातांनी चाकूने आक्रमण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे गंभीर घायाळ झाले.

सॅमसंग भारतात ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

‘सॅमसंग’ या मोठ्या विदेशी आस्थापनाने चीनमधून त्याचे कारखाने बंद करण्याचा प्रयत्न चालवला असून आता भारतातील उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये कारखाना चालू करणार आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रीमंडळाने सॅमसंगच्या ‘ओएल्ईडी डिस्प्ले युनिट’ उभारण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे.

निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे ‘मँगोनेट’ या संगणकीय प्रणालीवर नोंदणी करा ! – विभागीय कृषी सह संचालकांचे आवाहन

निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे मँगोनेट या संगणकीय प्रणालीवर नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येणार असून संबंधित आंबा बागायतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शनाची वेळ वाढवली

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, श्री जोतिबादेव, श्री दत्त भिक्षालिंग स्थानासह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून त्याची कार्यवाही चालू झाली आहे.

नागपूर येथे एकतर्फी प्रेम करणार्‍या धर्मांधाकडून हिंदु तरुणीची आजी आणि तिचा भाऊ यांची हत्या

हिंदूंनो, धर्मांधांची क्रूर आणि विकृत मानसिकता जाणा अन् त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात आपल्या मुली अडकू नयेत, यासाठी मुलींना वेळीच सावध करा !

sant dnyaneshwar

आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची पोलिसांनी केली सुटका; दोन धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद आहे ! कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंविषयी वादग्रस्त विधान करणारे अभिनेते योगराज सिंग यांना विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटातून काढले

ज्या चित्रपटांमध्ये हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान केला जातो, अशा चित्रपटांवरही हिंदूंनी बहिष्कार घातल्यास हिंदु धर्माचा अवमान करण्याचे धाडस कुणी करणार नाही !

गुरुकुंज मोझरी (जिल्हा अमरावती) येथे तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी भक्तांचे निषेध आंदोलन

राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुदेव भक्त आणि महिला यांनी निषेध आंदोलन करून महाद्वारस्थळी भजन केले.