बेंगळुरू – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये ६६ वर्षीय दत्तात्रेय होसबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी निवड करण्यात आली. वर्ष २००९ पासून ते संघाचे सहसरकार्यवाह होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांची एकमताने निवड झाली.
Bangaluru : Akhil Bharatiya Pratinidhi Sabha of RSS elected Shri Dattatreya Hosabale as its ‘Sarkaryavah’. He was Sah Sarkaryavah of RSS since 2009. pic.twitter.com/ZZetAvuTo4
— RSS (@RSSorg) March 20, 2021
होसबळे हे कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यातील सोराबा येथील आहेत. होसबळे हे लहानपणापासून संघामध्ये सक्रीय आहेत. वर्ष १९७२ पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय सदस्य म्हणून काम केले. आणीबाणीच्या काळात ते अटकेत होते. वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांना भाजपचा तोंडवळा म्हणून समोर आणण्यासाठी होसबळे आग्रही होते.