पुणे – कोरोनाबाधित रुग्णांसाठी अत्यावश्यक असणार्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर न करता खरेदी किमतीवर १० टक्के किंमत आकारून विक्री करण्याची सूचना अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफ्.डी.ए.चे) पुणे विभागाचे सहआयुक्त एस्.बी. पाटील यांनी किरकोळ औषध विक्रेत्यांना केली आहे. वेगवेगळ्या आस्थापनांनी उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किमतींना शहरात विकले जात असल्याचे निदर्शनात आले होते. सध्या कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन या इंजेक्शनची किंमत नियंत्रित करून ती दीड सहस्र रुपयांपर्यंत अल्प करण्याच्या हालचाली प्रशासनाने चालू केल्या आहेत, असे एफ्.डी.ए.च्या मुख्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.