हिंदुविरोधी विधाने करणार्‍या पाकच्या मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी

हिंदूंविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या पाकमधील फय्याज अल हसन चौहान या मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकच्या पंजाब प्रांतामधील सरकारमध्ये फय्याज हे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री होते.

भारताने अजमेर दर्ग्याला भेट देणार्‍या यात्रेकरूंना व्हिसा नाकारला ! – पाकच्या मंत्र्यांचा आरोप

यात्रेच्या नावाखाली पाक हेरगिरी करत आहे, असे सरकारला वाटल्याने ते नाकारण्याचा अधिकार भारताला आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !

आतंकवादी मसूद अझहरच्या २ भावांसह ४४ जणांना पाकमध्ये अटक

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचे २ भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर यांच्यासह ४४ जणांना पाकमध्ये अटक करण्यात आली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त पाकमधील कटासराज या शिवमंदिरात जाण्यास भारतीय हिंदूंनी टाळले

पाकच्या सिंध प्रांतातील चकवाल जिल्ह्यामधील भगवान महादेवाचे प्राचीन कटासराज मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी असते. एक सहस्र वर्षांहून प्राचीन असलेल्या या मंदिरात यावर्षी जाण्याचे भारतातील हिंदूंनी टाळले आहे.

हिंदूंच्या मंदिरामध्ये पाक सैन्याची चौकी

भारत आणि पाक सीमेवरील सिंधमधील नागपारकर जिल्ह्यातील करूंझर टेकडीवर अंबाजी मातेचे मंदिर आहे. या मंदिरालाच पाक सैन्याने त्यांची सीमेवरील शेवटची चौकी बनवली आहे. पूर्वी पाकिस्तानी सैनिक या मंदिराहून थोड्या दूरवर रहायचे.

(म्हणे) ‘मला नाही, तर काश्मीरचा प्रश्‍न सोडवणार्‍याला नोबेल द्या !’ –  इम्रान खान

पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरचा प्रश्‍न सोडवून संपूर्ण काश्मीर भारताला जोडण्याचे कार्य केल्यास त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकतो, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाकने भारताच्या विरोधात ‘एफ् १६’ चा वापर केला होता ! – पाकच्याच पत्रकाराची माहिती 

पाकचा खोटारडेपणा त्याचेच लोक उघड करत आहेत, ही पाकला आणि भारतातील राष्ट्रघातकी राजकीय पक्षांना चपराक होय !

मसूद अझहर बहावलपूर येथील जैशच्या मुख्य तळावर

पाकच्या बहावलपूर येथे जैशचे मुख्यालय आहे ! हे नष्ट करण्याचे धाडस आता भाजप सरकारने दाखवून दिले पाहिजे !

(म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही !’

या विधानावरून जैश-ए-महंमद ही पाक सरकार पुरस्कृत आतंकवादी संघटना आहे, हे लक्षात येते ! त्यामुळे तिच्यावर पाककडून कोणतीही कारवाई करण्याची अपेक्षा करता येणार नाही. आता भारताने मसूद अझहरसह या संघटनेचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारवाई करावी !

पाकच्या जनतेने ‘भारतीय’ समजून मारहाण केलेल्या त्यांच्याच वैमानिकाचा मृत्यू

जेव्हा ही मारहाणीची घटना घडली, तेव्हा पाकच्या सैन्याने भारताचे २ वैमानिक पकडल्याचे म्हटले होते. म्हणजेच पाकच्या सैन्यालाही त्यांच्याच वैमानिकाची खरी माहिती समजू शकलेली नव्हती. यावरून पाक हास्यास्पद ठरला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now