लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय गाण्यांवर नाचण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पंजाब उच्च शिक्षण आयोगाने सरकारी आणि खासगी दोन्ही महाविद्यालयांसाठी लागू केला. महाविद्यालयांमधील अनैतिक आणि अश्लील कृती थांबवण्यासाठी असा आदेश देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.