कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार उपस्थितांची संख्यामर्यादा हवी – उच्च न्यायालय

सध्या लग्नसमारंभांत ५०, तर अंत्यसंस्कारात २० व्यक्ती सहभागी होण्यास अनुमती आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवावर कोरोनाचे सावट, मंदिर प्रदक्षीणेवर निर्बंध घातल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर

शासनाने मंदिरे चालू केली असली, तरी तेथे मोकळेपणाने फिरता येत नसल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाविषयी भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ढगाळ वातावरणामुळे विदर्भात तुरीचे पीक धोक्यात !

तुरीचे पिक धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.

सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर

पाकचे पत्रकार कुअंर शाहिद यांनी दाखवला पाकच्या पंतप्रधानांना आरसा !

फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात ! सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !

कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाची हद्द निश्‍चित न झाल्यास महामार्गाचे काम बंद पाडणार ! – रूपेश नार्वेकर, नगरसेवक

शहरातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे; मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूंना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या हद्दीचे ‘नीस’ (हद्द समजण्यासाठीचे दगड) लावलेले नाहीत. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अवैध बाधकामे होत असून शहर बकाल होऊ लागले आहे.

पदयात्रेच्या वेळी कायद्याचा भंग केल्याविषयी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ संघटनेच्या विरोधात आमदार फ्रान्सिस्को पाचेको यांची तक्रार

अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला एखादी संघटना नियमबाह्य कृती करत असल्याचे का लक्षात येत नाही ?

सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांचा बहिष्कार : शासनाकडून बैठक रहित

गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनानिमित्त पुढील वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी ठेवलेली सर्वपक्षीय बैठक शासनाकडून रहित करण्यात आली आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप यांनी या बैठकीवर बहिष्कार घालणार, असे आधी सांगितले होते.

छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगाच्या स्फोटात २ जण घायाळ

नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक जीप उडवून लावल्याने २ नागरिक घायाळ झाले. बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरूंग पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे २ मासांतच संभाजीनगर येथे स्थानांतर

दोन मासांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारलेले डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तातडीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी स्थानांतर करण्यात आले आहे.