सिंधुदुर्गनगरी येथे ९ डिसेंबरला डाक अदालतीचे आयोजन
विशेषत: टपाल, स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर यांविषयीच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जातील.
पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी थांबलेली महिला, ही अतिशय गंभीर गोष्ट ! – महिला विभाग, गोवा सुरक्षा मंच
पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी महिला ग्राहकाची वाट पहात उभी रहाणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचच्या महिला विभागाने केले आहे.
मोपा विमानतळाजवळील अतिरिक्त भूमी शासनाने कह्यात घेण्यास तुळसकरवाडी ग्रामस्थांचा विरोध
मोपा विमानतळाकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने कह्यात घेतलेली भूमी परत करावी, अशी मागणी करत तुळसकरवाडी गावातील लोक मोठ्या संख्येने १ डिसेंबरला रस्त्यावर आले.
महानगरपालिकेने ‘बीफ’विक्रीला अनुमती दिल्यास आंदोलन छेडू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी
नालासोपारा (पूर्व) येथे ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती मिळावी, यासाठी राबिया अहमद रझा खान या महिलेने वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना महानगरपालिकेने ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती दिल्यास ‘मोठे आंदोलन छेडू’, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने मतदान ; नोटा पर्याय उपलब्ध नाही
पुणे आणि सांगली विभागात विक्रमी मतदान झाले !
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात राजू शेट्टी आणि पोलीस यांची बाचाबाची !
देहलीच्या बाहेर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. या वेळी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भाजप शासनाच्या काळात राज्यात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनियमितता आहे, असे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी अहवालात म्हटले होते.
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्साहात
८ मासांनंतर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहाने कार्तिक पौर्णिमा साजरी झाली. अनेक दत्त भक्तांनी मंदिर परिसरात दीप लावल्यामुळे तो उजळून गेला होता. दुपारी ३ वाजता पवमान सुकृत पठण केले. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला.
पैशांसह साड्यांची लाच मागणार्या सहकार अधिकार्यासह त्यांच्या मुलाला अटक
सोसायटीच्या दुरुस्तीसाठी ‘सिंकिंग फंड’ (दुरुस्ती निधी) वापरता यावा म्हणून दोन लाख रुपयांसह दोन साड्यांची लाच मागणारे सहकार अधिकारी भरत काकड आणि त्यांचा मुलगा सचिन काकड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे.