बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे मी किंवा मोदीजी सांगत नाही, तर संत सांगत आहेत. ही भविष्यवाणी खरी होणार आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आंदोलन करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’ म्हटले !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना एका सभेच्या वेळी आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’  संबोधले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी ‘चंद्रशेखर राव यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण तेलंगाणामध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार

राज्याचे मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस्. शर्मिला रेड्डी यांनी तेलंगाणा राज्यामध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकेत दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा संकेत दिला.

देशात कोरोना लस घेणार्‍या तिसर्‍या आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू

एका ४२ वर्षीय आरोग्य कर्मचार्‍याचे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले  

येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते.

देशात रहाणार्‍या एका समुदायाला ते देशभक्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते ! – असदुद्दीन ओवैसी

‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांना, जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे विरोध न करणार्‍यांना; बाबर, औरंबजेब यांची तळी उचलणार्‍यांना ‘हा देश आपला वाटतो’, ‘ते देशभक्त आहेत’, हे कसे मान्य करता येईल ?

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

ऑनलाईन कर्ज देऊन फसवणूक करणार्‍या चौघांना अटक

एका चिनी नागरिकाचा समावेश : चिनी नागरिकांची अशी गुन्हेगारी पहाता भारतीय यंत्रणा निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !

(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !