(म्हणे) ‘मी मानवतावादावर विश्‍वास ठेवते !’

काश्मिरी हिंदू आणि गोहत्यारे यांचा मृत्यू एक सारखाच असल्याचे म्हणणार्‍या अभिनेत्री साई पल्लवी यांचे फुकाचे स्पष्टीकरण

अभिनेत्री साई पल्लवी

भाग्यनगर – बजरंग दलच्या कार्यकर्त्याने अभिनेत्री साई पल्लवी यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पल्लवी यांनी त्यांच्या काश्मिरी हिंदू आणि गोहत्यारे यांचा मृत्यू एक सारखाच असल्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, मी डॉक्टर असल्याने मला प्रत्येक जिवाचे महत्त्व ठाऊक आहे. मला मुलाखतीमध्ये ‘मी डाव्या विचारसरणीची समर्थक आहे की उजव्या विचारसरणीची ?’, असे विचारण्यात आले होते. त्यावर मी तटस्थ असल्याचे सांगून ‘मानवतावादावर विश्‍वास ठेवते’, असे म्हटले होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असेही त्या म्हणाल्या. (हिंदूंनी आक्रमक पावित्रा घेतल्याने ‘प्रकरण अंगाशी येणार’, हे साई पल्लवी यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्या अशा प्रकारे सारवासारव करत आहेत. अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून हिंदूंनी त्यांना अद्दल घडवणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

जर मानवतावादावर विश्‍वास असता, तर काश्मिरी हिंदूंची व्यथा पाहून अभिनेत्री साई पल्लवी यांनी अशी हास्यास्पद तुलना केलीच नसती ! अशांवर कठोर कारवाई करणेच आवश्यक !