‘जर द्रौपदी राष्ट्रपती आहेत, तर पांडव कोण आहेत ?’

  • चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

  • तेलंगाणा येथे तक्रार प्रविष्ट

डावीकडून चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि द्रौपदी मुर्मु

भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘जर द्रौपदी राष्ट्रपती आहेत, तर पांडव कोण आहेत ? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत ?’ असे आक्षेपार्ह विधान चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करून केले. (अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक) या विरोधात तेलंगाणातील भाजपचे नेते गुडूर नारायण रेड्डी यांनी वर्मा यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यांनी वर्मा यांच्यावर ‘अ‍ॅस्ट्रॉसिटी’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून उभे करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

यावरून अशा दिग्दर्शकांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून येते. त्यांनी असा अवमान अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा केला असता का ? अशा हिंदुद्वेषी दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालून हिंदूऐक्याची चुणूक दाखवावी !