(म्हणे) ‘काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर या दोघांचा मृत्यू सारखाच !’

चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !

चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी

भाग्यनगर (तेलंगाणा) – दक्षिणेकडील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी यांनी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाची तुलना गोतस्करांवर होणार्‍या आक्रमणांशी केली आहे. काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर या दोघांचा मृत्यू सारखाच आहे, असे हिंदुद्वेषी विधान असलेला त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.  त्यांच्या या वक्तव्यानंतर आता लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.

तेलुगु भाषेमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी यांनी काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर यांवर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांना विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या की, या चित्रपटात काश्मिरी हिंदूंची हत्या कशी होते, हे दाखवण्यात आले आहे. त्यांनी आतंकवाद्यांकडून हिंदूंच्या निर्दयी हत्येचा संबंध स्थानिकांकडून गोतस्करांवर होणार्‍या आक्रमणांशी जोडला.

सौजन्य  : Greatandhra

संपादकीय भूमिका

  • एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही ! मात्र स्वतःला ‘निधर्मी’ आणि मानवतावादी रंगवण्याच्या नादात त्यांनी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना पाठिंबाच जाहीर केला आहे. अशांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार टाकून त्यांना ताळ्यावर आणावे !
  • आजची पिढी ही दुर्दैवाने चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांनाच आदर्श मानत असल्याने एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना अशा प्रकारे बाष्कळ बडबड करणार्‍या अभिनेत्रींवर कठोर कारवाईच व्हायला हवी !