अभिनेत्री साई पल्लवी यांच्याविरोधात बजरंग दलाकडून पोलिसांत तक्रार !

भाग्यनगर (तेलंगाणा) – दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी यांचे गोरक्षकांच्या विरोधात केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याच्या विरोधात येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. बजरंग दलाचे कार्यकर्ता अखिल म्हणाले की, पल्लवी यांनी गोप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तर ‘आम्ही या प्रकरणाचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करू !’, असे आश्वासन पोलीस निरीक्षक पी. पद्म यांनी दिले.

भाजपचे प्रवक्ते एन्.व्ही. सुभाष म्हणाले की, ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपट हा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी आहे. साई पल्लवी यांना भारताचा इतिहास आणि संस्कृती यांविषयी कोणतेच ज्ञान नसून त्या केवळ दिग्दर्शक सांगतात, तशी भूमिका निभावतात.

पल्लवी यांनी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाची तुलना गोतस्करांवरील आक्रमणांशी केली होती. काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर यांचा मृत्यू सारखाच असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.