करीमनगर (तेलंगाणा) – कुठल्याही ठिकाणी मशिदीच्या परिसरात खोदकाम केले जाते, तेथे शिवलिंग मिळते. आम्ही राज्यातील सर्व मशिदींमध्ये खोदकाम करू. जर तेथे मृतदेह मिळाले, तर त्यावर तुम्ही (मुसलमान) दावा करा आणि जर शिवलिंग मिळाले, तर मशीद आम्हाच्याकडे सोपवा. तुम्ही हे आव्हान स्वीकारणार का ?, असे आव्हान तेलंगाणा राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना दिले. ‘देशात रामराज्य आल्यानंतर उर्दू भाषेवर बंदी घातली जाईल’, असेही त्यांनी या वेळी म्हटले. ते येथे हिंदु एकता यात्रेत बोलत होते.
BJP नेता बंडी संजय की ओवैसी को चुनौती: तेलंगाना में सारी मस्जिदों की खुदाई करें, अगर वहां शिवलिंग मिलते हैं तो हिंदुओं को सौंप दें, शव मिलते हैं, तो आपकी#owaisi #bjp #Telangana https://t.co/a8bH2U2ess pic.twitter.com/aXJPdrloHK
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 26, 2022
बंडी संजय कुमार पुढे म्हणाले की,
१. देशात बाँबस्फोट होतात; कारण मदरसे आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रे बनली आहेत.
२. जर तेलंगाणामध्ये भाजपचे सरकार आले, तर आम्ही अल्पसंख्यांकांना देण्यात आलेले आरक्षण समाप्त करू.
३. आमच्या भगिनींना लव्ह जिहादच्या नावाखाली फसवले जात असल्याने आम्ही गप्प कसे काय बसू ? गरीब हिंदूंचे होणारे धर्मांतर सहन केले जाणार नाही.
४. हैदराबादच्या निझामाच्या शासनकाळात रझाकारांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांविषयी ढोंगी धर्मनिरपेक्षतावाल्यांचे डोळे उघडण्यासाठी लवकर ‘रझाकार फाइल्स’ नावाचा चित्रपट बनवला जाईल.