‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !

हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !

धाडस असेल, तर भाजप सरकारने चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावे ! – असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान

ओवैसी म्हणाले, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू !

लालूप्रसाद यादव कारागृहातून बिहार सरकार पाडण्याचा कट रचत आहेत ! – भाजपचा आरोप

बिहार सरकारने या आरोपाची चौकशी करावी आणि जर हे सत्य असेल, तर लालूप्रसाद यादव यांना कारागृहात भ्रमणभाष संच कसा उपलब्ध झाला, याचाही शोध घेऊन संबंधितांना आजन्म कारागृहात डांबावे !

अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.

‘गूगल पे’द्वारे पैशांचे हस्तांतरण होणार बंद

जानेवारी २०२१ पासून ‘गूगल पे’ या अ‍ॅपवरून ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ (एका खात्यातून दुसर्‍या खात्यात) ही पैसे हस्तांतर करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी गूगलकडून ‘इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम’ आणण्यात येणार असून त्याचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कोरोनाच्या सावटाखाली पुणे जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून अल्प प्रतिसाद

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा चालू केल्या आहेत. दोन दिवसांत एकूण ३६६ शाळा चालू झाल्या आहेत. २३ नोव्हेंबर या दिवशी ९ सहस्र ४३५ विद्यार्थी उपस्थित होते, तर २४ नोव्हेंबर या दिवशी ३ सहस्र १५९ विद्यार्थी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता !

दिवाळीमुळे खरेदी साठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि हिवाळा यांमुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २४ नोव्हेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यात एकूण ८३७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ४१६ जणांचा समावेश आहे.

कोरोनाची चाचणी न करताच शाळेत उपस्थित झालेले शिक्षक कोरोनाबाधित आढळले

सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा चालू करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करून शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आदेश आहेत; परंतु चाचणी न करताच येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत एक शिक्षक २३ नोव्हेंबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले.

सर्वांसाठी लोकलचा निर्णय १५ डिसेंबरनंतर घेणार ! – आयुक्त

सर्वांसाठी लोकल सेवा चालू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतरच घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. ‘टीव्ही-९ मराठी’ या वृत्तवाहिनीबरोबर साधलेल्या विशेष संवादाच्या वेळी ते बोलत होते.