राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन !

राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करतांना शिवशक्ती प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

कोल्हापूर, १३ जानेवारी – अखंड हिंदुस्थानची प्रेरणा राजमाता जिजाऊ यांच्या ४२३ व्या जयंतीच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने गंगावेस येथील राजमाता हायस्कूल प्रांगणातील राजमाता जिजाऊंच्या स्मारक परिसरात फुलांची सजावट करण्यात आली. त्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन कारणात आले. या वेळी शिवशक्ती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, राजमाता तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य आदी उपस्थित होते.

विविध संघटनांच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन !

राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करतांना हिंदु महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

शहरात विविध संघटनांच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यात अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष जयवंत निर्मळ यांसह कोल्हापूर महापालिका डॉ. कादंबरी बलकवडे यांसह अन्य उपस्थित होते.