‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई – बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या साहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. यासाठी तात्काळ प्रतिसाद पथकातील डॉ. हर्षल भोईर (९९८७२८०९२१) आणि डॉ. अजय कांबळे (९९८७४०४३४३)यांचे क्रमांक पालिकेने घोषित केले आहेत.

हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे त्या विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यरत साहाय्यक अभियंता यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर विभाग कार्यालयातील त्या अधिकार्‍यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी या पक्षांची विल्हेवाट मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लावणार आहेत.

आतापर्यंत देशातील १० राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, देहली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र येथे बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे.