मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांचे विधान
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – नावामुळे गैरसमज सिद्ध होत असतात. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे काम आणि व्यवहार महंमद अली जिना यांच्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. आधी जिनांनी देशाचे विभाजन केले. वर्ष १९४७ मध्ये बापूंकडून (गांधी यांच्याकडून) चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे झाले.
महात्मा गांधी की भूल की वजह से देश का विभाजन हुआ :
मध्यप्रदेश के प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा का बयान #MahatmaGandhi #Gandhi pic.twitter.com/T0iTsyyExy
— News24 (@news24tvchannel) January 11, 2021
तसे विभाजन सिंह करत आहेत, असे विधान मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी येथील गांधीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.