संमत निधीची कामे महापालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवा ! – राजेश क्षीरसगार, शिवसेना

विविध विषयांच्या सदर्भात महानगरपालिकेत बैठक

महापालिका आयुक्तांसमवेत बैठकीत चर्चा करतांना शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आणि अन्य महापालिका अधिकारी

कोल्हापूर – महानगरपालिकेची संमती नसतांना निवडणुकीच्या धर्तीवर नागरिकांना आमीष दाखवण्यासाठी विकासकामे चालू आहेत. घरपट्टी थकित असतांना बांधकामास अनुमती दिली जाते. योजनेतून संमत झालेल्या निधी वाटपात शहरातील प्रत्येक प्रभागास समप्रमाणात न्याय दिला जात नाही. शहराचा विकास साध्य करायचा असल्यास सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. शहरास विशेष गोष्ट म्हणून ५ कोटी रुपयांचा निधी आणला असून, यातून होणारी कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवावीत, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. विविध विषयांच्या सदर्भात महानगरपालिकेत बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.

अधिकारी नियम मोडून काम करत असत असतील, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू ! – आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

महापालिका आयुक्तांसमवेत बैठकीत चर्चा करतांना शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आणि अन्य महापालिका अधिकारी

या वेळी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, हद्दवाढीप्रश्‍नी संबधित ग्रामपंचायतींना विश्‍वासात घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव सादर करू. गुंठेवारी नियमितीकरणाची १४ सहस्र प्रकरणे प्रविष्ट झाली होती. त्यातील ५ सहस्र प्रकरणांवर कार्यवाही चालू आहे. बाकी सर्व प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. घरपट्टी, टी.डी.आर्. प्रकरणाची चौकशी करून संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. जे अधिकारी नियम मोडून काम करत असत असतील, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले, सर्वश्री ऋतुराज क्षीरसागर, राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे यांसह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.