Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध

  • हमीरपूर (हिमाचल प्रदेश) येथील घटना

  • पुतळ्यामुळे द्वेष निर्माण होण्याची वर्तवली शक्यता !

हमीरपूर (हिमाचल प्रदेश) – हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूर येथील मशिदीसमोर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला मुसलमान सुधारणा सभेने विरोध केला आहे. या प्रकरणी सुधारणा सभेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी हे प्रकरणी उपजिल्हाधिकार्‍यांकडे पाठवले असून ते यावर कारवाई करणार आहेत.

मुसलमान सुधारणा सभेचे सरचिटणीस रफिक यांचे म्हणणे आहे की, शहराचे सौंदर्यीकरण केले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि शहर सुंदर असले पाहिजे. पुतळा बसवण्यास कोणताही आक्षेप नाही; परंतु तो मशिदीसमोर बसवू नये. आजूबाजूच्या भागातील मुसलमान येथे मशिदीत नमाजपठण करण्यासाठी येतात. जर मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा असेल, तर द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून हा पुतळा दुसरीकडे कुठेतरी स्थापित करावा. पुतळा बसवण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही; पण भविष्यात वाद निर्माण होऊ नये; म्हणून त्याचे स्थान पालटले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • महाराणा प्रताप यांच्यामुळे द्वेषाची भावना कशी निर्माण होऊ शकते ? ते राष्ट्रपुरुष होते आणि त्यांनी मोगलांशी लढा दिला. त्यातून प्रत्येक भारतियाने प्रेरणा घेणे आवश्यक असतांना मुसलमानांना असा विचार का येतो ? ते भारतीय आहेत कि मोगलांचे वंशज ? याची आता चर्चा झाली पाहिजे !
  • हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्‍या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !