सुजानपूर (हिमाचल प्रदेश) येथील प्रकरण
सुजानपूर (हिमाचल प्रदेश) – येथे मशिदीसमोर बांधण्यात येणार्या उद्यानात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यास मुसलमानांच्या संघटनेचे घेतलेला आक्षेप आता मागे घेतला आहे. त्यामुळे आता हा पुतळा येथे स्थापित करण्यात येणार असून या संघटनेचे सदस्य त्या वेळी उपस्थितही राहू शकणार आहेत, अशी माहिती नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजमेर ठाकूर यांनी दिली.
विश्व हिंदु परिषदेने प्रशासनाला नियोजित ठिकाणीच पुतळा बसवण्याच्या निर्णयापासून मागे हटू नये, असे आवाहन केले होते. विहिंपच्या राज्य शाखेचे उपसचिव पंकज भारतीय म्हणाले की, मशिदीसमोरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही. राज्याबाहेरील मुसलमान नेत्यांचा एक गट हिंदुविरोधी भावना निर्माण करत आहे.