अध्यात्माचा गंध नसलेल्या तृप्ती देसाई यांची अभ्यासहीन टीका
व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. स्त्रियांसाठी नऊवारी साडी, तर पुरुषांसाठी सदरा आणि धोतर हा सात्त्विक पोषाख आहे. धर्मशास्त्रानुसार मंदिरामध्ये पुजारी सोवळे नेसतात. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसल्यामुळे तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यातून त्यांचे अज्ञानच प्रकट होत आहे !
मुंबई – मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत ? असा प्रश्न तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी येथील श्री साई संस्थानला विचारला आहे. शिर्डी येथील श्री साई देवस्थानात तोकड्या कपड्यांमध्ये दर्शनासाठी येण्याविषयी भाविकांनी देवस्थानकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरून श्री साईबाबा देवस्थानने मंदिरात सभ्यतापूर्ण वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे. यावरून तृप्ती देसाई यांनी ही टीका केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘मंदिरात प्रवेश करतांना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत, याचे भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरून ठरवता येत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते.’’
(सौजन्य : TV9 Marathi)
मंदिरातील वस्त्रसंहिता ही नग्नतेशी नव्हे, तर धर्मशास्त्राशी संबंधित ! – हिंदु जनजागृती समिती
सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे मंदिर विश्वस्तांना आवाहन
मुंबई – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने मंदिरात प्रवेश करतांना भाविकांना भारतीय संस्कृतीनुसार आणि सभ्यतापूर्ण वस्त्र परिधान करण्याचे नुकतेच आवाहन केले आहे. अशा प्रकारे केवळ साई संस्थाननेच नव्हे, तर देशभरातील अनेक मंदिरांमध्ये, तसेच गोव्यातील चर्चमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात आलेली आहे. मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली वस्त्रसंहिता ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित आहे. केवळ मंदिरच नव्हे, विविध क्षेत्रांमध्ये वस्त्रे कोणती घालावीत, याचे काही नियम ठरलेले आहेत. त्या ठिकाणी ‘असेच वस्त्र का ?’, असे कुणी विचारत नाही; मात्र हिंदु देवस्थानांनी असे आवाहन केले की, लगेच अन्याय झाल्याची अभ्यासहीन ओरड केली जाते.
मंदिरात श्रद्धेने येणारे भक्त आणि धर्मपरंपरा यांचे पालन करणारे भाविक या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत याचे आनंदाने पालन अन् स्वागतच करतील, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे. तसेच साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करावी, असे आवाहनही सर्व मंदिर विश्वस्तांना श्री. घनवट यांनी केले.
सभी मंदिरों में वस्त्रसंहिता लागू करने का मंदिर न्यासियों से आवाहन
मंदिर की वस्त्रसंहिता नग्नता से नहीं; धर्मशास्त्र से संबंधित! -हिन्दू जनजागृति समिति⛳
शिर्डी के श्री साईबाबा संस्थान ने श्रद्धालुआें को भारतीय संस्कृति के अनुसार सभ्यतापूर्ण वस्त्र परिधान करने का आवाहन किया है! pic.twitter.com/pUfh6UySls
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) December 2, 2020
श्री. घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात, अशी अत्यंत अभ्यासहीन टीका करणारे तथाकथित पुरोगामी संस्थानने काय आवाहन केले आहे, हे पण नीट वाचत नाहीत. संस्थानने कुठेही तोकड्या कपड्यांचा उल्लेख केला नाही, पुरुष-महिला असा उल्लेख केला नाही, तरी अनेक दिवस प्रसिद्धी न मिळाल्याने केलेला हा ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. संस्थानने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. सोवळे-उपरणे घालणार्या पुजार्यांना अर्धनग्न म्हणणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे. पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, अधिवक्त्यांचा काळा कोट हे धर्मनिरपेक्ष शासनानेच योजलेले ‘ड्रेस कोड’ चालतात; मात्र मंदिरात केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे केवळ आवाहनही चालत नाही. हा पुरोगाम्यांचा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे.
Why civilised dress must only for devotees, not priests, asks social activist Trupti Desai against the backdrop of Shirdi Saibaba temple trust’s appeal to devotees to be dressed in ‘civilised manner’
— Press Trust of India (@PTI_News) December 2, 2020
संभाजीनगरमधील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानात सर्वच पुरुषांना कमरेच्यावर वस्त्र न घालण्याचा नियम आहे. तो महिलांना मुळीच नाही. येथे धर्मशास्त्रात महिलांच्या लज्जारक्षणाचा विचार केलेला आहे; मात्र हे समजून घेण्याची इच्छाच ज्यांना नाही, त्यांना काय सांगणार ? पांढरा पायघोळ झगा घालणार्या ख्रिस्ती पाद्रीवर, तोकडा पायजामा घालणार्या मौलवीवर वा मुसलमान महिलांनी काळा बुरखा घालण्याच्या पद्धतीवर टीका करण्याचे धाडस पुरोगाम्यांमध्ये आहे का ?, असा प्रश्नही घनवट यांनी उपस्थित केला.