भारतीय परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम !
आजच्या आधुनिक युगात वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झालेली असली, तरी काही दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी अजूनही पर्याय मर्यादित आहेत. ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी.एस्.) हा असाच एक दुर्मिळ; पण गंभीर ‘न्यूरोलॉजिकल’ (मज्जासंस्थेशी संबंधित) आजार आहे. यावर प्रचलित उपचारपद्धत महागड्या आणि दीर्घकालीन असतात. त्यामुळे अनेक रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो; मात्र ‘पंचगव्य चिकित्सा’ (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय यांचे मिश्रण) आणि ‘ओझोन थेरपी’ हे या आजारावर प्रभावी अन् नैसर्गिक उपाय ठरू शकतात. (या थेरपीद्वारे ओझोनचा उपयोग करून शरिरात ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ करून पेशींना नवसंजीवन देण्यासाठी केला जातो.) गेल्या काही वर्षांत पुण्यातील वैद्य दिलीप कुलकर्णी आणि इतर आयुर्वेदाचार्य यांनी पंचगव्य चिकित्सा अन् ओझोन थेरपी यांचा कर्करोग, मधुमेह, त्वचारोग, तसेच मज्जासंस्था विकारांवर यशस्वी वापर केला आहे. या उपचारपद्धतीमुळे रुग्णांना औषधांवरचा अवलंब न्यून करता आला आहे. ‘जी.बी.एस्.’ हा एक जटिल आणि आव्हानात्मक आजार आहे; मात्र पंचगव्य अन् ओझोन चिकित्सा ही त्यावर आशादायी ठरू शकते. भारतीय संस्कृतीतील गो-चिकित्सा अन् आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय केल्यास, नैसर्गिक अन् प्रभावी उपचार उपलब्ध होऊ शकतात. याविषयी या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया !
(पूर्वार्ध)
१. ‘जी.बी.एस्.’ म्हणजे काय ?
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ हा एक ‘ऑटोइम्यून’ विकार आहे, म्हणजेच हा आजार शरिराच्या रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित असतो. सामान्यतः शरिरातील रोगप्रतिकारक पेशी हानीकारक जंतूंवर आक्रमण करतात; मात्र ‘जी.बी.एस्.’मध्ये हीच प्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या मज्जासंस्थेवर आक्रमण करते, ज्यामुळे मज्जातंतूंना हानी पोचते आणि स्नायू शक्ती न्यून होते.
२. ‘जी.बी.एस्.’ची प्रमुख कारणे आणि लक्षणे

‘जी.बी.एस्.’ आजाराचे मुख्यतः कोणतेही निश्चित एकच कारण नसले, तरी ‘व्हायरल’ (संसर्ग) किंवा बॅक्टेरियल संसर्ग, लसीकरणानंतरचा प्रतिकारशक्तीतील बिघाड, ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’ आणि अनुवांशिक घटक यांमुळे हा आजार होऊ शकतो.
३. आयुर्वेदानुसार कारणे
‘जी.बी.एस्.’ हा वात दोषाच्या असंतुलनामुळे उद्भवतो’, असे आयुर्वेद सांगते. वात हा मज्जासंस्थेचा प्रमुख नियंत्रक असून त्याच्या असंतुलनामुळे शरिरातील स्नायू दुर्बल होतात, रक्तप्रवाह बिघडतो, संवेदना मंदावतात आणि शरिराला इजा होते.
४. ‘जी.बी.एस्.’ची प्रमुख लक्षणे
अ. शरिराच्या खालच्या भागात चालू होऊन हळूहळू वर जाणारा अशक्तपणा
आ. स्नायूंच्या हालचालींवर परिणाम, हालचाल मंदावणे
इ. छातीतील जडत्व, रक्तदाबातील चढ-उतार
ई. नैसर्गिक प्रतिकारशक्ती न्यून होऊन वारंवार आजार होणे
उ. बधिरपणा, गुडघे आणि हातपाय निकामी होण्याची शक्यता
५. पंचगव्य चिकित्सा – भारतीय परंपरेतील वैज्ञानिक उपचार
भारतीय संस्कृतीत गायीला ‘माता’ मानले गेले आहे आणि तिच्या पंचगव्यामध्ये (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय) असंख्य औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदानुसार पंचगव्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, पेशींची पुनर्बांधणी होते आणि मज्जासंस्थेला बळकटी मिळते.
६. ‘जी.बी.एस्.’साठी पंचगव्य आणि ओझोन थेरपीचा संयोग
अ. गायीचे दूध आणि तूप यांचा नियमित वापर मज्जासंस्थेसाठी लाभदायी आहे.
आ. गोमूत्राचे नियमित सेवन केल्याने विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
इ. ओझोनयुक्त पंचगव्य औषध शरिरातील दोषांचे संतुलन राखून मज्जासंस्थेला सुदृढ बनवते.
७. ओझोन चिकित्सा – आधुनिक विज्ञानाचा चमत्कार
ओझोन (O3) हा ऑक्सिजनच्या तुलनेत अधिक सक्रीय वायू आहे आणि त्यामध्ये शक्तीशाली जीवाणूनाशक आणि विषाणूनाशक गुणधर्म असतात. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ओझोन चिकित्सेमुळे शरिरातील जंतूंना मारण्यात साहाय्य होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
८. ओझोन चिकित्सेचे लाभ
अ. मज्जातंतूंची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करते.
आ. शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवते. त्यामुळे पेशींना अधिक ऊर्जा मिळते.
इ. रोगजंतू (व्हायरस), बॅक्टेरिया आणि विषाणू यांवर परिणामकारक प्रभाव टाकते.
इ. रक्त शुद्धीकरण करून प्रतिकारशक्ती वाढवते.
९. ‘जी.बी.एस्.’वरील पंचगव्य-ओझोन चिकित्सा : एक प्रभावी पर्याय !
अ. पारंपरिक उपचारांपेक्षा सुलभ, स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय
आ. शरिराच्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीला बळकटी देतो
इ. महागड्या स्टिरॉइड्स आणि ‘इम्युनोग्लोब्युलिन’ यांच्या तुलनेत याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याखेरीज याचे लवकर परिणाम दिसून येण्याची शक्यता अधिक आहे.
१०. भारतीय परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम !
‘जी.बी.एस्.’ हा न्यूरोलॉजिकल विकार असून त्यावर अद्याप संपूर्ण उपचारपद्धत निश्चित नाही. पारंपरिक औषधोपचार महागडे आणि दीर्घकालीन असले, तरी पंचगव्य चिकित्सा अन् ओझोन थेरपी यांचा योग्य वापर केल्यास हा आजार अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येऊ शकतो. आयुर्वेद आणि निसर्गोपचार हे भारतीय विज्ञानाचे अमूल्य योगदान असून गायीच्या पंचगव्याचे औषधी गुणधर्म मज्जासंस्थेचे पोषण करून शरिराची प्रतिकारशक्ती वाढवतात. यासह ओझोन थेरपी शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून पेशींना पुनरुज्जीवित करून विषाणूंवर प्रभावीपणे कार्य करते आणि स्नायूंना पुनर्बल देते.
प्राचीन भारताने नेहमीच ‘सर्वे सन्तु निरामयाः’ (सर्वांना चांगले आरोग्य लाभो) हा मंत्र जपला आहे. आजच्या काळात आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन यांचा योग्य समन्वय साधल्यास गंभीर आजारांवर प्रभावी, सुरक्षित अन् नैसर्गिक उपचार विकसित करता येतील. गो-चिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समतोल राखल्यास भारत जगासमोर आरोग्यविषयक एक नवा आदर्श निर्माण करू शकतो ! आधुनिक वैद्यकीय विज्ञानासह भारतीय परंपरेतील चिकित्सापद्धतींचा सखोल अभ्यास आणि प्रयोग केल्यास ‘जी.बी.एस्.’, तसेच इतर दुर्धर आजारांवर आशादायी परिणाम मिळू शकतात. त्यामुळेच या उपचारपद्धतींचा व्यापक प्रचार आणि संशोधन होणे आवश्यक आहे, जेणेकरून अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल. ‘जे पारंपरिक आहे तेच वैज्ञानिक आहे, फक्त त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे !’
(क्रमशः)
– वैद्य दिलीप कुलकर्णी, पंचगव्य-ओझोन चिकित्सा संशोधक आणि आयुर्वेदाचार्य, कोथरूड, पुणे. (७.३.२०२५)
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/896026.html