माघ वारी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वारकर्यांनी घेतली भेट
कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने अनेक सार्वजनिक उपक्रम चालू झाले आहेत. मंदिरेही दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच लसीकरणाची मोहीमही चालू करण्यात आली आहे. नियम आणि अटी पाळून वारकर्यांना वारीसाठी संमती मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.