आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करून कार्तिकी यात्रेचे आयोजन करावे ! – आळंदी ग्रामस्थांची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

आळंदी – यंदा आळंदीची कार्तिकी यात्रा ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये प्रतिवर्षी कार्तिकी एकादशीला ७ ते ८ लाख भाविक आळंदीत येत असतात. सध्या आळंदी शहरात प्रतिदिन ४ ते ५ कोरोना रुग्ण सापडत असून भविष्यात होणार्‍या कार्तिकी यात्रेचे आयोजन मोजक्याच वारकर्‍यांच्या उपस्थितीत केले जावे, असे लेखी निवेदन संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीला देण्यात आले आहे आणि ते सहव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी स्वीकारले आहे.