श्रीक्षेत्र आळंदीसह सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! – आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

वारकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

धर्मरक्षणार्थ ९ डिसेंबरला आळंदी (जिल्हा पुणे) येथे वारकरी अधिवेशनाचे आयोजन !  

आळंदी, देहू आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य टिकवण्यासाठी या परिसरात मद्य आणि मांस यांवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी यांसह विविध मागण्यांसाठी १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडीला पोलीस बंदोबस्त देण्याची वारकर्‍यांची मागणी !

कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्‍या वारकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

नामदेव महाराज दिंडीच्या मार्गातील खड्डे बुजवण्याच्या वारकर्‍यांनी केलेल्या मागणीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्‍यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?

वारकर्‍यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून ‘आळंदी बंद’ मागे !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती.

तणावमुक्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करायला हवे ! – पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थान येथील मारहाणप्रकरणी धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये मुसलमानांकडून वारकर्‍यांवर आक्रमण करण्यात आले होते.

दिंडीसाठी ‘प्लॉट’ वाटपाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल ! – उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एका दिंडीला केवळ ३ दिवस ‘प्लॉट’ (जागा) देणे अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करून त्यांची नोंद करण्यात यावी आणि भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ घंटे दर्शन !

यात्रा कालावधीत ८ ते १० लाख वारकरी येतील, प्रत्येक घंट्याला अडीच ते तीन सहस्र वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील, या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता केली आहे.

कीर्तन जिहाद ?

‘सबका मालिक एक है ।’ असे म्‍हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्‍या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्‍मद रसूलुल्लाह’, असे म्‍हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्‍याचे अनुसरण करत होते.