जळगाव, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – पाळधी येथून शेगावपर्यंत प्रवास करणार्या भाविकांची पायी दिंडी पाळधीलगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून गावातील मुख्य रस्त्यावर ५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता जात होती. या वेळी पोलीस प्रशासनाने तेथे कर्मचारी पाठवत दिंडीतील भजनी मंडळातील वाहनचालकांना थांबवले आणि ‘गावातून जातांना कुठलेही भजन म्हणू नका किंवा कुठलाही आवाज करू नका’, असे सांगितले. (असे अन्य धर्मियांना सांगण्याचे धाडस पोलीस दाखवतील का ? – संपादक) यामुळे भाविक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मनात पोलीस प्रशासनाविषयी असंतोषाची भावना आहे.
मागील वर्षीच्या दिंडीत धर्मांधांचे आक्रमण !
२८ मार्च २०२३ या दिवशी पाळधी येथे मशिदीसमोरून जळगाव ते सप्तशृंगी देवी (वणी गड) येथे पायी दिंडी जात असतांना धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात दगड, विटा काचेच्या बाटल्या भक्त आणि पोलीस यांच्यावर फेकल्या होत्या. या वर्षीप्रमाणे तेव्हाही दिंडीत विघ्न आले होते. |
संपादकीय भूमिका :
|