पंढरपूर येथे ‘भक्तीसागर’ (६५ एकर), वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांगेची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पहाणी !

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्राशेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारकर्‍यांनी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले.

‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन होणार !

राज्यातील कीर्तनकार आणि वारकरी यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याच्या हेतूने, तसेच त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारकऱ्यांचे जाणून घेतलेले मनोगत इथे प्रस्तुत करीत आहोत.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी भावविभोर !

वारकरी भाविकांसाठी नव्याने ५ ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

इंद्रायणीतील प्रदूषण थांबवण्यासाठीही जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे वारकर्‍यांना वाटते !

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर येथे आगमन !

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ११ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले !

प्रारंभी पताकाधारी, हंडा-तुळस घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, सेवेकरी, टाळकरी आणि मृदंगवादक यांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दोन्ही अश्वांनी रिंगण दाखवण्याची १ प्रदक्षिणा पूर्ण केली.

‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’च्या वतीने वारकर्‍यांसाठी रेनकोट वाटप !

आषाढी वारीच्या निमित्ताने ‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’ यांच्या वतीने समतानगर येथील गेली १८ वर्षे दिंडीसाठी पायी चालत जाणार्‍या १५० वारकर्‍यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी ‘रेनकोट’चे वाटप करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे लोणंद येथे आज नीरा नदीत स्नान होणार !

वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.

२१ जुलैपर्यंत पंढरपूर येथे वारीसाठी जाणार्‍या सर्व वाहनांना पथकर माफ !

गतवर्षीप्रमाणे यंदाही मुख्‍यमंत्र्यांनी पंढरपूर येथे वारीसाठी वाहनांसाठी पथकरमाफ (‘टोल फ्री’) घोषित केली असून त्‍याचा लाभ २१ जुलैपर्यंत वारकर्‍यांना मिळणार आहे. वारीत सहभागी असलेल्‍या वाहनांना परिवहन विभागातून ‘स्‍टीकर्स’ दिले जाणार आहेत.