उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे गट सध्‍या तरी ‘मशाल’ चिन्‍ह वापरू शकणार !

उद्धव ठाकरे गटाला २७ मार्च या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयातून पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्‍ह म्‍हणून वापरण्‍याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्‍हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे.

महाराष्ट्रातील शिंदे आणि ठाकरे गट यांची सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात !

१५ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीत ‘तत्कालीन राज्यपालांची भूमिका ही संविधानाच्या चौकटीत होती’ असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ‘ईडी’कडून अटक !

मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’ने दापोली तालुक्याचे माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना १४ मार्चला अटक केली.

सिंधुदुर्ग : असुविधांच्या निषेधार्थ माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरे बांधून आंदोलन !

आरोग्य सुविधेसारख्या मूलभूत आवश्यकतांसाठी आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद !

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा !

येत्या ८ दिवसात संबंधित ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री आणि गाढवे यांच्यावर  कारवाई न केल्यास संबंधित ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांमध्ये मोकाट कुत्री अन् गाढवे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल.

उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

‘साई रिसॉर्ट’वर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे – माजी आमदार संजय कदम

बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत रहाणार कि नाही ?, असा प्रश्‍न उभा राहिला ! – भास्कर जाधव

आताचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत सगळीकडे ही कामे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाली आहेत, असे खोटेच सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांसाठी एकही पैसा दिलेला नाही.

शिवसेना नाव चोरले; मात्र पक्ष चोरू शकत नाही ! – उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात सार्वजनिक सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.