शाहूपुरी (सातारा) पोलीस निरीक्षकपदी मुंबई येथील धनंजय फडतरे यांची नियुक्ती !

सातारा, १४ जुलै (वार्ता.) – शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे पुणे शहर पोलीस ठाणे येथे स्थानांतर झाले आहे. त्यामुळे शाहूपुरी पोलीस निरीक्षकपदी मुंबईतील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.

फडतरे हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले गावचे असून त्यांनी कराड महामार्ग पोलीस विभागात, तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांतील विभागांत सेवा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री जयंत पाटील यांचे सुरक्षा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या चांगल्या कामाची नोंद घेऊन त्यांना पोलीस महासंचालक पदाने गौरवण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाला प्रारंभ केला.