मी तडजोड करणार नाही ! – राज ठाकरे

मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्‍याच्‍या चर्चा चालू असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस !

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार ही नोटीस अध्यक्षांनी पाठवली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली !

या भेटीविषयी अद्याप एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे यांच्‍याकडून अधिकृतपणे वाच्‍यता करण्‍यात आलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्‍यास शिवसेनेला अडचण येऊ शकते, अशी चर्चा आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश !

सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्याच्या संदर्भात ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी त्‍यांनी गाडीने एकत्र प्रवास केला.

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ठाकरे गटाला १५ दिवसांत भूमिका सांगण्‍याचे आवाहन !

प्रकाश आंबेडकर एम्.आय.एम्.शी युती करणार असल्‍याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्‍यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची सर्वाेच्च न्यायालयात याचिका !

१७ जुलै या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हा निर्णय येतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहीममध्‍ये अज्ञातांनी औरंगजेबासह प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले !

माहीम परिसरात अज्ञातांनी उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब यांचे वादग्रस्‍त मजकुरासह एकत्रित छायाचित्र असलेले फलक मध्‍यरात्री लावले होते. सकाळी स्‍थानिक शिवसैनिकांनी तात्‍काळ हे फलक हटवले.

मुंबई येथे कोविड केंद्रातील घोटाळा प्रकरणी १६ हून अधिक ठिकाणी ‘ईडी’च्‍या धाडी !

मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये सुजित पाटकर यांच्‍या ‘लाईफलाईन हॉस्‍पिटल मॅनेजमेंट सर्व्‍हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्‍या वेळी हे आस्‍थापन अस्‍तित्‍वात नव्‍हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्‍याचाही आरोप आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात

सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. ‘मातोश्री’वर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे.