विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईत उपस्थित !

विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांचेच सरकार कायम !

उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळेच राज्यातील सरकार कोसळल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला न्यायालयाकडून मान्यता दर्शवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल – उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी कि नाही, हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता !

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्‍पष्‍ट केले आहे.

मुंबईचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन

अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्‍वर यांची प्रकृती ठीक नव्हती. ते मूळचे सिंधुदुर्ग येथील होते.

प्रकल्पाला भूमी देणार्‍या शेतकर्‍यांना आस्थापनाचे भागधारक म्हणून सामावून घ्या ! – माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत

या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे -सदाभाऊ खोत

प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे

आंदोलन पुन्हा जोर धरणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ११ जणांना केली अटक

प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार ! – उद्धव ठाकरे

प्रकल्‍प करण्‍यापूर्वी स्‍थानिकांपुढे प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे सादरीकरण व्‍हायला हवे. बळजोरीने प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्‍पग्रस्‍तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

६ मे या दिवशी तेलशुद्धीकरण प्रकल्प होण्यासाठी युतीचा मोर्चा : उद्धव ठाकरे आंदोलकांना भेटण्यासाठी बारसूत येणार

राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सूत्रावरून राजकारण तापत आहे. काही प्रकल्प समर्थकही ठाकरे यांची भेट घेणार आहेत.