‘जनमानसातील शिदोरी’ मासिकावरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह !
पुणे – काँग्रेसचे मुखपत्र ‘जनमानसातील शिदोरी’ या मासिकाच्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे २ लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या प्रकरणी ‘ज
नमानसातील शिदोरी’ मासिकावर कारवाई करण्याची मागणी केली होती; मात्र त्या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले; परंतु शिंदे-फडणवीस सरकारने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे. चालू पावसाळी अधिवेशनात विधानसभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जनमानसातील शिदोरी’ मासिकावर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका मांडली. गृहमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या या भूमिकेचे रणजित सावरकर यांनी स्वागत केले; मात्र त्याचसह ‘महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे वीर सावरकर यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती केली होती, त्याही प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात यावा’, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.
Veer Savarkar : ‘शिदोरी’वरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा दाखल करा – रणजित सावरकर यांची मागणी https://t.co/7TLBKOd4lN via @www.marathi.hindusthanpost.com @Dev_Fadnavis @RanjitSavarkar
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 2, 2023
राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती आणि चारित्र्यहनन या आरोपांखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी तक्रारीत केली आहे. तसेच याआधीही राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाची तक्रार भोईवाडा न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने देहली पोलिसांना अन्वेषणाचे आदेश दिले आहेत.
काय आहे ‘शिदोरी’ मासिकाचे प्रकरण ?या मासिकाच्या फेब्रुवारी २०२०च्या अंकात ‘स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर’ आणि ‘अंधारातील सावरकर’, असे २ लेख छापण्यात आले होते. अत्यंत विकृत मनोवृत्तीने लिहिलेले आणि १०० टक्के असत्यावर आधारित, वस्तूस्थितीचा विपर्यास करणारे हे लेख वीर सावरकरांची मानहानी करणारे आहेत. त्यात ज्या ‘वीक’ मासिकातील लेखांचा संदर्भ देण्यात आला आहे, त्याविषयी न्यायालयात खटला प्रविष्ट आहे. त्यामुळे वीर सावरकरांची अपकीर्ती करणार्या ‘शिदोरी’ मासिकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सावरकरप्रेमींकडून करण्यात आली. |