आमदारांच्या सुनावणीच्या पद्धतीविषयी चर्चा !
मुंबई – शिवसेनेचे १६ आमदार पात्र कि अपात्र ? याविषयी १२ ऑक्टोबर या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली; मात्र या वेळी कोणतीही ठोस भूमिका निश्चित करण्यात आली नाही. प्रत्येक आमदाराची स्वतंत्र सुनावणी घ्यावी कि सर्वांची एकत्रित ? यावर चर्चा झाली. शिंदे गटाच्या आमदारांनी प्रत्येक आमदाराच्या स्वतंत्र सुनावणीची मागणी केली, तर ठाकरे गटाच्या आमदारांनी एकत्रित सुनावणीची मागणी केली. सुनावणी एकत्रित कि स्वतंत्रपणे याविषयीची सुनावणी २० ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि अधिवक्ता उपस्थित होते, तर शिंदे गटाचे केवळ अधिवक्ता उपस्थित होते.