आचारसंहितेत पालट केला असल्यास निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे ! – उद्धव ठाकरे

अमित शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपला निवडून दिल्यास श्री रामल्लाच्या दर्शनासाठी विनामूल्य नेण्याची घोषणा केली.

आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. वायकर यांनी मुंबई येथील जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर १ पंचतारांकित उपाहारगृह बांधल्यासंबंधीची तक्रार होती.

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या कार्यकर्त्यांसह दीड सहस्र जणांवर गुन्हे नोंद !

बेळगाव पोलिसांनी अनुमती नाकारलेली असतांनाही १ नोव्हेंबरला निषेधफेरी काढणे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याविषयी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे १८ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दीड सहस्र मराठी भाषिक यांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे !

दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

एकमेकांची लफडी बाहेर काढण्याला दसरा संमेलन म्हणतात का ? – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

दसरा मेळाव्याच्या व्यासपिठाचा उपयोग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होत असल्याविषयी वरील प्रतिक्रियेद्वारे सेंगर यांनी खंत व्यक्त केली.

दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांचे शक्तीप्रदर्शन !

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी २४ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सभेद्वारे शक्तीप्रदर्शन केले.

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे तुकडे होतील ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना  

मुंबई येथील ‘दसरा मेळाव्या’त उद्धव ठाकरे यांची गर्जना !

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ललित पाटील याची चौकशी का केली नाही ? – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते.

गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाची निदर्शने !

दसरा आणि दीपावली यांमुळे वस्तूंची विक्री आणि देवाणघेवाण वाढली आहे. याचसमवेत उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. असे असतांना महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली सतत भारनियमन होत आहे.

…तर सुनावणीचे वेळापत्रक आम्ही ठरवून देऊ !-सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

विधानसभा अध्यक्षांकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जायला हवी. नियमित सुनावणी घेऊन याविषयीचा निर्णय पूर्ण करायला हवा. ‘नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ’, असे अध्यक्ष म्हणू शकत नाहीत.