माध्यान्ह भोजनात मुसलमान विद्यार्थ्यांना झटका पद्धतीचा मांसाहार दिल्याने पालकांचा विरोध !

गेली काही वर्षे हिंदूंना हलाल मांस विकण्यात येत आहे, त्याविषयी हिंदू अज्ञानी आहेत; मात्र झटका मांस खाऊ घालण्यात आल्यावर लगेच त्याचा विरोध करणारे  मुसलमान किती जागरूक आहेत, हे हिंदू लक्षात घेतील का ?

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी !

गुंडांचा भरणा असणारा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? हा पक्ष लोकशाहीला कलंक असून त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

बंगालमध्ये गीता जयंतीनिमित्तच्या रथयात्रेवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचे आक्रमण ! – भाजपचा आरोप

आणखी किती दिवस बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदू मार खात रहाणार आहेत ? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे धाडस कधी दाखवण्यात येणार ?

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक  

भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !

बंगालमध्ये भाजपच्या सभेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार

तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात असतांना केंद्रातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरील, असेच जनतेला वाटते !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍याच्या घरात गावठी बाँब बनवतांना स्फोट ! : ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू

हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारेही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची गुंडगिरी आणि राष्ट्रघातकी कारवाया यांविषयी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘तृणमूल काँग्रेसचे समर्थन करणार्‍या बांगलादेशींनाच मतदारसूचीमध्ये समाविष्ट करा !’  

तृणमूल काँग्रेसला बांगलादेशातील मुसलमान घुसखोर चालतात; कारण ते तृणमूल काँग्रेसला मतदान करतात; मात्र बांगलादेशातून भारतात आलेल्या पीडित हिंदूंसाठी काहीही न करणारा हा पक्ष अशा प्रकारे फतवे काढतो, हे लक्षात घ्या !

तृणमूल काँग्रेसचे नेते अबुल हुसैन याच्या घरातील बाँबस्फोटात लहान मुलगी ठार  

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल गावठी बाँबचा कारखाना झाला आहे आणि त्यामागे स्वतः तृणमूल काँग्रेसच आहे, हेच अबुल हुसैन याच्या घटनेतून स्पष्ट होते ! केंद्र सरकारने आता वाट न पहाता या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !

(म्हणे) ‘आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात ?’

कुणाच्या दिसण्यावरून, तसेच त्यांच्या शारीरिक व्यंगावरून अशा प्रकारचे विधान करणे पाप आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतींविषयी असे विधान करते, यावरून त्यांची पात्रता काय आहे, हे स्पष्ट होते.

बंगालमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या वाहनताफ्यावर गावठी बाँब आणि दगड यांद्वारे आक्रमण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच अशा घटनांवर एकमेव उपाय आहे. हे जोपर्यंत केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे अशक्यच आहे !