बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या प्रकियेमध्ये हिंसाचार !

पंचायत निवडणुकांची प्रक्रिया घोषित झाल्यापासून हिंसाचार

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये पंचायत निवडणुकांची प्रक्रिया घोषित झाल्यापासून हिंसाचार चालू झाला आहे. नदिया जिल्ह्यातील नक्काशीपाडा येथे गावठी बाँब फोडण्यात आले, तसेच काँग्रेसच्या उमेदवारावर आक्रमण करण्यात आले. बांकुडा येथील सोनामुखी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार दिबाकर घरामी आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यात एक कार्यकर्ता घायाळ झाला आहे.

दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील कुलतली येथे माकपच्या महिला उमेदवाराच्या पतीवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. यात एक जण घायाळ झाला आहे. हे आक्रमण तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 (सौजन्य : India Today)

संपादकीय भूमिका

बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !