मुंबई – राज्यात बर्ड फ्ल्यूमुळे हानी होणार्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.
पशूसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, बर्ड फ्ल्यू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची हानीभरपाई देणे आणि रोग नियंत्रणाच्या अंतर्गत १३० लाख रुपये संमत केले आहेत. बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची हानीभरपाई दिली जाणार आहे.
सौजन्य : एबीपी माझा