येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला !

येस बँक घोटाळा प्रकरण

येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर

मुंबई – येस बँकेत झालेल्या घोटाळाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले या बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी फेटाळून लावला आहे. ‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’ला कर्ज स्वरूपात ३ सहस्र कोटी रुपये देण्याच्या संदर्भात नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप राणा कपूर यांच्यावर आहे. यासमवेत ३ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बदल्यात राणा कपूर यांना ६०० कोटी रुपयांचा लाभ झाला आहे, असेही अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अन्वेषणात समोर आले होते. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडूनही या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष न्यायालयाकडून जामीन फेटाळल्यानंतर राणा कपूर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज प्रविष्ट करण्यात आला होता. यावर वरील सुनावणी झाली.